
अकोला, 17 ऑगस्ट (हिं.स.)। नांदेडमधील धनेगाव परिसरातील पेट्रोल पंपावर 8 ऑगस्ट रोजी इंदरजितसिंघ बलजितसिंग बावरी यांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. फायनान्स कंपनीच्या हप्त्यापोटी जप्त केलेल्या दुचाकीच्या वादातून हा पूर्वप्राइज्ड खून झाल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी कारवाई करत आतापर्यंत 8 जणांना अटक केली आहे. दरम्यान या घटनेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.. या हत्याकांडाची सखोल चौकशी व्हावी आणि कठोर कारवाईसाठी विविध संघटनांकडून निवेदने दिली जात आहेत.
अकोल्यातही आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली आहे.. ही हत्या ही केवळ वैयक्तिक वादातून झालेली नसून यामागे भूमाफिया, वाळू तस्कर आणि अवैध धंदे घालवणाऱ्या संघटित गुन्हेगारांचे गोठे षड्यंत्र असण्याची तीव्र शंका आहे यामागे कोणते अदृश्य हात कार्यरत आहेत आणि या कटाची पाळेमुळे कुठे पसरली आहेत, याचा शोध घेणे अत्यंत गरजेचे आहे. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्यांचे राजकीय, प्रशासकीय वरदहस्त आणि गुन्हेगारीचे जाळे पाहता या संपूर्ण हत्याकांडाचा आणि त्यामागील षड्यंत्राचा पातळीवरील तपासावर दबाव आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो निष्पक्ष, पारदर्शक आणि सखोल तपास व्हावा यासाठी हा तपास केंद्रीय अन्वेषण विभागकडे सोपवण्यात यावा.. अशी मागणी ही करण्यात आली आहे..
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे