पातुर तालुक्यातील धोधानी डोहामध्ये बुडून युवकाचा मृत्यू!
अकोला, 17 ऑगस्ट (हिं.स.)। पातुर तालुक्यातील अति डोंगराळ दुर्गम परिसरात वसलेल्या धोधानी येथील प्रसिद्ध असलेल्या धबधब्यामध्ये अकोला येथील 22 वर्षीय युवक साहिल अहमद जमील अहमद या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली सदर मृतक युवक आणि त्याचे अकोला य
प्रतिकात्मक लोगो


अकोला, 17 ऑगस्ट (हिं.स.)। पातुर तालुक्यातील अति डोंगराळ दुर्गम परिसरात वसलेल्या धोधानी येथील प्रसिद्ध असलेल्या धबधब्यामध्ये अकोला येथील 22 वर्षीय युवक साहिल अहमद जमील अहमद या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली सदर मृतक युवक आणि त्याचे अकोला येथील सहकारी हे धबधब्यामध्ये पोहण्यासाठी आले होते पोहण्यासाठी मृतक पाण्यामध्ये उतरला परंतु पाण्याच्या वर आलाच नाही

सदर घटनेची माहिती मिळताच पातुर पोलीस स्टेशनचे सहायक ठाणेदार अजय वानखडे आणि त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी जाऊन सदर युवकाचे मृतदेहाचा पंचनामा केला आणि पातुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित करून अकोला येथे शव विच्छेदनासाठी पाठविले पातुर तालुक्यातील धरणे तलाव नद्या धबधबे हे पर्यटन स्थळे असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे वाहनाने आलेल्या पर्यटकांकडून काही लोक पार्किंगच्या नावाखाली आर्थिक लोक सुद्धा करीत आहेत सदर पर्यटन स्थळी सुरक्षा आणि प्रशासनाचे सातत्याने होत असलेले दुर्लक्ष याबाबत वृत्त प्रकाशित होत आहेत परंतु प्रशासनाकडून त्याबाबत काहीच उपाययोजना होत नसल्याने नागरिकांकडून खंत व्यक्त होत आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande