
अकोला, 17 ऑगस्ट (हिं.स.)। शिवसेनेचे माजी आमदार तथा अकोला लोकसभा संपर्कप्रमुख डॉ. राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी, २० ऑगस्ट २०२६ रोजी अकोला जिल्हा नियोजित दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'निवडणूक SIR' संबंधी माहिती घेणे आणि संघटनेचा सर्वसमावेशक आढावा घेणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे.
शिवसेना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अनिल मालगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यादरम्यान गुरुवारी सकाळी ११:०० वाजता पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या सभागृहात अकोला जिल्हा कार्यकारिणीची विशेष बैठक पार पडणार आहे. या बैठकीत जिल्ह्यातील पक्षसंघटन अधिक मजबूत करणे आणि आगामी निवडणुकांची रणनीती आखण्याबाबत सविस्तर चर्चा केली जाईल.या बैठकीनंतर सायंकाळी संपर्कप्रमुख डॉ. राजन साळवी सोयीनुसार मुंबईकडे रवाना होणार आहेत. या संपूर्ण दौऱ्यादरम्यान त्यांच्यासोबत त्यांचे स्वीय सहाय्यक सुहास नारकर उपस्थित राहणार आहेत. जिल्हा कार्यकारिणीच्या या महत्त्वाच्या बैठकीस सर्व संबंधित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षश्रेष्ठींकडून करण्यात आले आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे