भवरवाडीच्या २६ विद्यार्थ्यांची मुंबईत कलागुणांची भरारी
‘कॅलिफेस्ट २०२७’साठी अच्युत पालव कॅलिग्राफी फाउंडेशनचे विशेष निमंत्रण बीड, १७ ऑगस्ट (हिं.स.)। गेल्या काही वर्षांत जिल्हा परिषद शाळांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत शिक्षणाचे नवे मापदंड निर्माण केले आहेत. आष्टी ता
Q


‘कॅलिफेस्ट २०२७’साठी अच्युत पालव कॅलिग्राफी फाउंडेशनचे विशेष निमंत्रण

बीड, १७ ऑगस्ट (हिं.स.)। गेल्या काही वर्षांत जिल्हा परिषद शाळांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत शिक्षणाचे नवे मापदंड निर्माण केले आहेत. आष्टी तालुक्यातील भवरवाडी येथील अवघ्या २६ विद्यार्थ्यांची जिल्हा परिषद शाळा याचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

शाळेतील शिक्षक अनिल बेदरे यांच्या पुढाकारातून मधल्या सुट्टीचा सदुपयोग करत विद्यार्थ्यांना सुलेखन (कॅलिग्राफी) आणि रांगोळीचे प्रशिक्षण दिले जात आहे. पारंपरिक शिक्षणासोबत कलेची जोड देत विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, कल्पकतेला आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारा हा अभिनव उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.

या उपक्रमाची दखल अच्युत पालव कॅलिग्राफी फाउंडेशन, मुंबई यांनी घेतली आहे. संस्थेच्या वतीने १३ ते १७ जानेवारी २०२७ या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या ‘कॅलिफेस्ट’ या भारतीय लिप्यांच्या उत्सवासाठी भवरवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना सामूहिक प्रात्यक्षिकासाठी विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.

आगामी १३ जानेवारी २०२७ रोजी सायंकाळी ४.३० वाजता प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये भवरवाडीच्या विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.

ग्रामीण भागातील या छोट्याशा शाळेतील विद्यार्थ्यांना मुंबईसारख्या मोठ्या व्यासपीठावर आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्याची मिळालेली संधी ही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची तसेच शिक्षकांच्या अथक परिश्रमांची पोचपावती मानली जात आहे.

केवळ २६ विद्यार्थ्यांची संख्या असली, तरी भवरवाडीच्या या शाळेची भरारी मोठी आहे. अशा समर्पित शिक्षकांच्या कल्पक उपक्रमांना प्रोत्साहन देत मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण, नाविन्यपूर्ण आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याला दिशा देणारे शिक्षण पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande