
नांदेड, 17 ऑगस्ट (हिं.स.)।
आकाश आडपोड यांच्या भगिनी कु. आकांक्षा आडपोड (बोथी, ता. उमरी) हिची 'महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग - ग्रुप बी' मध्ये एस. टी. महिला प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांकाने दुय्यम निबंधक (SR), राज्य कर निरीक्षक (STI) या पदासाठी निवड झाल्याबद्दल नायगाव विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार राजेश पवार यांनी अभिनंदन केले!
कोणतेही खाजगी क्लासेस न लावता धर्माबाद येथे स्वयं - अध्ययन, जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर कु. आकांक्षा हिने मिळवलेले हे देदीप्यमान यश अनेक युवक-युवतींसाठी प्रेरणादायी आहे. आई-वडिल व कुटुंबियांच्या कष्टाचे चीज करुन तिने मिळवलेला हा बहुमान आम्हा सर्व नांदेडकरांसाठी अभिमानास्पद आहे. असे आमदार राजेश पवार म्हणाले
कु. आकांक्षा आडपोड हिच्या या यशाबद्दल मन: पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis