त्र्यंबकेश्वरला भाविकांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे सुविधा
District administration provides facilities for devotees to Trimbakeshwar
District administration provides


District administration provides


जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती

नाशिक, 17 ऑगस्ट (हिं.स.)।श्रावण सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथे येणाऱ्या भाविकांसाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विविध सुविधा पुरविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

देशातील बारा जोतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे श्रावण सोमवारनिमित्त मोठ्या संख्येने भाविक येतात. या भाविकांसाठी विविध सुविधा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पुरविण्यात येत आहेत. भाविकांची वाहने खंबाळे वाहनतळावर लावण्यात येत आहेत. तेथून एसटी बसची सुविधा आहे. भाविकांची संख्या मोठी असल्याने दूरपर्यंत दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. या भाविकांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाचे पथक तैनात करण्यात आले आहे. व्हीआयपी दर्शनाची सुविधा आजच्या दिवशी अंशतः बंद करण्यात आली आहे. पावसापासून बचावासाठी उपाययोजनाही करण्यात आली आहे.

एकाच वेळेस वाहनांची गर्दी होऊ नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्र्यंबकेश्वरकडे येणाऱ्या विविध मार्गांवर प्रशासन लक्ष ठेवून आहे. पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, उपविभागीय अधिकारी डॉ. पवन दत्ता, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार गणेश जाधव, त्र्यंबक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वर येथे भेट देत पाहणी केली आहे. त्यामुळे भाविकांना त्र्यंबकेश्वरचे दर्शन घेणे अधिक सुलभ झाले आहे. तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास मदत झाल्याचे जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande