एक इंचही जमीन देणार नाही,डीएमआयसी विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
छत्रपती संभाजीनगर, 17 ऑगस्ट (हिं.स.)। छ संभाजीनगर ( गाडीवाट) डीएमआयसी प्रकल्पासाठी होणाऱ्या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. गावातील तरुण शेतकरी एकत्र येत भूसंपादनाच्या नोटिशीची होळी केली. “आमची जमीन आम्ही कोणत्याही परिस्थितीत देण
एक इंचही जमीन देणार नाही,डीएमआयसी विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार


छत्रपती संभाजीनगर, 17 ऑगस्ट (हिं.स.)।

छ संभाजीनगर ( गाडीवाट) डीएमआयसी प्रकल्पासाठी होणाऱ्या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. गावातील तरुण शेतकरी एकत्र येत भूसंपादनाच्या नोटिशीची होळी केली. “आमची जमीन आम्ही कोणत्याही परिस्थितीत देणार नाही,” असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला. शेतीवरच कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असून, पिढ्यानपिढ्या जपलेली जमीन प्रकल्पासाठी घेण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली. शासनाने शेतकऱ्यांचा विश्वासघात करू नये, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. जमीन जबरदस्तीने घेतल्यास न्यायालयीन आणि लोकशाही मार्गाने आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande