राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे योगदान कायम प्रेरणादायी - आमदार अनुराधा चव्हाण
छत्रपती संभाजीनगर, 17 ऑगस्ट (हिं.स.)। सावंगी, छत्रपती संभाजीनगर येथे राजस्थानचे राज्यपाल तथा महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे नाना यांची आमदार अनुराधा चव्हाण यांनी भेट घेऊन वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. साधेपणा, स
Q


छत्रपती संभाजीनगर, 17 ऑगस्ट (हिं.स.)।

सावंगी, छत्रपती संभाजीनगर येथे राजस्थानचे राज्यपाल तथा महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे नाना यांची आमदार अनुराधा चव्हाण यांनी भेट घेऊन वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या.

साधेपणा, सेवाभाव, संघटननिष्ठा आणि जनसामान्यांशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं ही नानांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनाची ओळख आहे. फुलंब्रीसह मराठवाड्यात भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक वाटचाल मजबूत करण्यात त्यांनी दिलेले योगदान कायम प्रेरणादायी राहिले आहे. नानांना निरोगी, दीर्घायुष्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. असे आमदार अनुराधा चव्हाण यांनी सांगितले

यावेळी मंत्री, आमदार, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन आमदार श्री.सुहासभाऊ शिरसाठ यांनी केले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande