
छत्रपती संभाजीनगर, 17 ऑगस्ट (हिं.स.)।
श्रावण मासातील प्रथम सोमवारनिमित्त आज जामखेड, ता. अंबड येथील श्री खडेश्वर महादेव मंदिर संस्थान येथे भाविकांनी जाऊन भगवान श्री खडेश्वर महादेवांचे मनोभावे दर्शन घेतले.
श्रावण महिन्यात भगवान महादेवाच्या भक्तीला विशेष महत्त्व असून, या पवित्र महिन्यात मंदिरात दर्शन घेताना मनाला विशेष आध्यात्मिक समाधान व सकारात्मक ऊर्जा मिळते. यावेळी महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी, उत्तम आरोग्यासाठी तसेच जालना जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना भाविकांनी केली.
श्री खडेश्वर महादेव मंदिर संस्थानच्या वतीने सुरू असलेल्या धार्मिक व सामाजिक उपक्रमांची माहिती घेतली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis