नांदेड : शिवदुर्गा संवाद दौरा हदगाव येथे आयोजित
नांदेड, 17 ऑगस्ट (हिं.स.)। शिवदुर्गा संवाद दौरा हदगाव येथे आयोजित करण्यात आला होता. शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी यासंदर्भात सांगितले की शिवदुर्गा संवाद दौऱ्यासाठी मोठा प्रतिसाद मिळाला. या संवादाच्या निमित्ताने व्यापक मोहीम हाती घेण्यात आली असल
Q


नांदेड, 17 ऑगस्ट (हिं.स.)।

शिवदुर्गा संवाद दौरा हदगाव येथे आयोजित करण्यात आला होता. शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी यासंदर्भात सांगितले की शिवदुर्गा संवाद दौऱ्यासाठी मोठा प्रतिसाद मिळाला. या संवादाच्या निमित्ताने व्यापक मोहीम हाती घेण्यात आली असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे व संसदरत्न युवानेते खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हा शिवदुर्गा संवाद दौरा हदगाव येथे आयोजित करण्यात आला होता.

यावेळी उपस्थित राहून महिला भगिनींशी संवाद साधला.यावेळी शिवसेना महिला प्रवक्त्या तथा खासदार ज्योतीताई वाघमारे, आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्यासह शिवसेना महिला पदाधिकारी व महिला भगिनी उपस्थित होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande