आमदार सुरेश धस यांच्या उपस्थितीत संगमेश्वर महादेव मंदिराच्या भूमिपूजन सोहळा
बीड, १७ ऑगस्ट (हिं.स.)। मौजे खडकत येथील भोस्टे वस्ती येथे संगमेश्वर महादेव मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यास भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस उपस्थित राहिले. त्यांच्या हस्ते विधिवत मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळ
Q


बीड, १७ ऑगस्ट (हिं.स.)। मौजे खडकत येथील भोस्टे वस्ती येथे संगमेश्वर महादेव मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यास भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस उपस्थित राहिले. त्यांच्या हस्ते विधिवत मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी आमदार सुरेश धस यांनी भगवान संगमेश्वर महादेवांच्या चरणी नतमस्तक होत परिसरातील ग्रामस्थांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

आमदार सुरेश धस म्हणाले की, मंदिर हे केवळ श्रद्धेचे स्थान नसून गावाच्या एकतेचे, संस्कृतीचे आणि आध्यात्मिक परंपरेचे केंद्र असते. संगमेश्वर महादेव मंदिराच्या उभारणीमुळे भोस्टे वस्ती परिसरातील भाविकांसाठी सुंदर आणि भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.

भूमिपूजन सोहळ्यानंतर आमदार धस यांनी ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधला. मंदिर उभारणीसाठी पुढाकार घेणाऱ्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले. भक्ती, श्रद्धा आणि ग्रामस्थांच्या एकजुटीच्या बळावर संगमेश्वर महादेव मंदिराचे हे पवित्र कार्य निश्चितच सुंदररीत्या पूर्णत्वास जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी परिसरातील ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande