चर्चगेट परिसरातील आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग
मुंबई, 17 ऑगस्ट (हिं.स.)। दक्षिण मुंबईच्या चर्चगेट परिसरातील आयकर भवनात सोमवारी दुपारी अचानक आग लागल्याने काहीशी धावपळ उडाली. आगीची माहिती मिळताच आयकर विभागाच्या तळमजल्यावरील लोक तत्काळ इमारतीबाहेर पडले, तर वरच्या मजल्यावरील लोक इमारतीच्या टेरेसवर
Massive Fire at Income Tax Department Office in Churchgate Area


मुंबई, 17 ऑगस्ट (हिं.स.)। दक्षिण मुंबईच्या चर्चगेट परिसरातील आयकर भवनात सोमवारी दुपारी अचानक आग लागल्याने काहीशी धावपळ उडाली. आगीची माहिती मिळताच आयकर विभागाच्या तळमजल्यावरील लोक तत्काळ इमारतीबाहेर पडले, तर वरच्या मजल्यावरील लोक इमारतीच्या टेरेसवर गेले.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सुमारे आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आयकर विभागाच्या सात मजली इमारतीत लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी आणि ती इतर मजल्यांपर्यंत पसरण्यापासून रोखण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत. या घटनेत आतापर्यंत कोणालाही दुखापत झाल्याची किंवा जीवितहानी झाल्याची माहिती नाही. आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आयकर भवनात आयकर विभागाची अनेक महत्त्वाची कार्यालये आणि युनिट्स कार्यरत आहेत. अग्निशमन दल आणि प्रशासकीय अधिकारी परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. आग पूर्णपणे आटोक्यात आल्यानंतरच नुकसानीचे मूल्यांकन करता येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande