रत्नागिरी : विलवडे स्थानकासंदर्भात एकाच दिवशी आमदार-खासदारांना निवेदने
रत्नागिरी, 17 ऑगस्ट (हिं.स.) । विलवडे रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे काल, दि. १६ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी दोन आमदार आणि एक खासदार अशा तीन लोकप्रतिनिधींची वेगवेगळ्या ठिकाणी भेट घेऊन त्यांना निवेदने देण्यात आली. आमदार राम कदम यांना संघटनेच्या १२ सहकाऱ्यांन
डोंबिवलीचे आमदार राजेश मोरे यांना विलवडे स्थानकासंदर्भात निवेदन


रत्नागिरी, 17 ऑगस्ट (हिं.स.) । विलवडे रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे काल, दि. १६ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी दोन आमदार आणि एक खासदार अशा तीन लोकप्रतिनिधींची वेगवेगळ्या ठिकाणी भेट घेऊन त्यांना निवेदने देण्यात आली.

आमदार राम कदम यांना संघटनेच्या १२ सहकाऱ्यांनी एकत्रितरीत्या भेटून एकजूट दाखविली. रमेश बेर्डे, प्रशांत पालकर, सुनीत मोहिते, सुनील लोटणकर (विलवडे), सदानंद खामकर (आरगाव), दीपक जानस्कर (शिरवली), चंद्रकांत काटकर (कोंडगे), संतोष भितळे (व्हेळ), रवींद्र जानस्कर, संदीप सातोपे (शिरवली), अनिल जाधव (झर्ये) आणि अंकुश कोरगावकर (कळसवली) यांचा त्यात समावेश होता.

विलवडे रेल्वे प्रवासी ग्रामीण संघटनेतर्फे रत्नागिरी दौऱ्यावर असलेले खासदार नारायण राणे यांची शासकीय विश्रामगृहावर भेट घेऊन त्यांना विलवडे रेल्वे स्थानकाच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष रमेश कदम, प्रकाशजी तोरस्कर, कोंडगे गावचे सरपंच डॉ. सीतारामजी कदम, लांजा पंचायत समिती सदस्य शैलेशजी खामकर (आरगाव), सुभाष काटकर, मंगेश जाधव व इतर सहकारी उपस्थित होते. श्री. राणे यांनी विलवडे रेल्वे स्थानकावर दोन गाड्यांना थांबा मिळावा यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे शिफारस करण्याचे आश्वासन दिले.

कालच्याच दिवशी डोंबिवलीचे शिवसेना आमदार राजेश मोरे यांची भेट घेऊन विलवडे स्थानकावर दोन गाड्यांना थांबा मिळावा, अशी विनंती केली. त्यांनी बुधवारी डीआरएम यांच्याशी बैठक घेण्याचे आश्वासन दिले असून, समितीचे प्रतिनिधीही त्यांच्यासोबत या बैठकीला उपस्थित राहतील. श्री. मोरे यांना संघटनेतर्फे नीलेश पाटील, प्रशांत पालकर (विलवडे), सदानंद खामकर (आरगाव), दीपक जानस्कर, रवींद्र जानस्कर (शिरवली) यांनी श्री. मोरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande