
नाशिक, 17 ऑगस्ट (हिं.स.)।
- जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये पुन्हा एकदा दुपारच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणविल्याची समोर आली आहे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगावी असे आवाहन केलेले आहे.
नाशिक जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणविल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे नाशिक जिल्ह्यातील ,पेठ तालुका मध्ये गोंदे, भायगाव, जांभूळमाळ,हरणगाव येथे आज सोमवारी दुपारी 12.40 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.कोणती जीवित अथवा वित्त हानी झालेले नाही.
तर दिंडोरी तालुक्यात ननाशी बाडगीचापाडा परिसरात आज सोमवारी 12:45 दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले आहेत,
सुरगाणा, बोरगाव परिसरात आज सोमवारी दुपारी 12.40 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.कोणती जीवित अथवा वित्त हानी झालेले नाही. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले असून या सर्व परिस्थिती वरती प्रशासनाच्या वतीने लक्ष आहे नागरिकांनी पण सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI