बीडच्या युवकांसाठी रोजगाराची नवी संधी
बीड, 17 ऑगस्ट (हिं.स.)। बीडमध्ये सी-ट्रिपल आयटी केंद्राच्या माध्यमातून युवकांना रोबोटिक्स, 3D प्रिंटिंग, डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमेशनसह आधुनिक तंत्रज्ञानाचे उद्योगाभिमुख प्रशिक्षण मिळणार आहे. टाटा टेक्नॉलॉजीज आणि एमआयडीसीच्या संयुक्त विद्यमाने
जिल्हाधिकारी


बीड, 17 ऑगस्ट (हिं.स.)।

बीडमध्ये सी-ट्रिपल आयटी केंद्राच्या माध्यमातून युवकांना रोबोटिक्स, 3D प्रिंटिंग, डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमेशनसह आधुनिक तंत्रज्ञानाचे उद्योगाभिमुख प्रशिक्षण मिळणार आहे. टाटा टेक्नॉलॉजीज आणि एमआयडीसीच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या केंद्रात 18 अभ्यासक्रम व 9 आधुनिक लॅबची सुविधा आहे. प्रथम वर्षासाठी प्रवेश मोफत असून प्रवेश परीक्षेद्वारे निवड केली जाणार आहे. प्रशिक्षणानंतर उद्योगक्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून सप्टेंबरअखेर प्रशिक्षणाला सुरुवात करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिली

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande