
जालना, 17 ऑगस्ट (हिं.स.)।
जालना शहरातील समर्थनगर येथील घृष्णेश्वर मंदिर परिसरात शिव महापुराण कथा व शिवरात्र रुद्राक्ष अभिषेक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिव महापुराण कथा आणि शिवरात्र रुदक्ष अभिषेक उत्सव
या मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे.
धार्मिक सोहळ्यास शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी उपस्थित राहून भगवान महादेवाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले.
यावेळी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधत सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख पंडितदादा भुतेकर, सखाराम लंके, उज्वलाताई फोपलिया यांच्यासह परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis