जालन्यात दगडुशेठ गणपती बाप्पा उत्सव मंडळाच्या वतीने श्री गणेशाच्या आगमन सोहळ्याचे आयोजन
जालना, 17 ऑगस्ट (हिं.स.)। जालना शहरामध्ये दगडुशेठ गणपती बाप्पा उत्सव मंडळाच्या वतीने श्री गणेशाच्या आगमन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले . या सोहळ्याला शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी उपस्थित राहून गणरायाचे मनोभावे स्वागत केले. यावेळ
अ


जालना, 17 ऑगस्ट (हिं.स.)।

जालना शहरामध्ये दगडुशेठ गणपती बाप्पा उत्सव मंडळाच्या वतीने श्री गणेशाच्या आगमन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले .

या सोहळ्याला शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी उपस्थित राहून गणरायाचे मनोभावे स्वागत केले.

यावेळी गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. आमदार अर्जुनराव खोतकर यांनी मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांशी संवाद साधून उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख पंडितदादा भुतेकर, शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाचफुले, उद्योजक कैलास लोहिया, आशिष ओझा तसेच दगडुशेठ गणपती बाप्पा उत्सव मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande