श्री संत सावता संकूल यांच्या विद्यमाने भव्य मॅरेथॉन स्पर्धा संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 17 ऑगस्ट (हिं.स.)। राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे (नाना) यांच्या वाढदिवसानिमित्त फुलंब्री तालुक्यातील श्री संत सावता संकूल यांच्या विद्यमाने आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. खेळामुळे शारीरिक तंदुरुस्ती, आत्म
अ


छत्रपती संभाजीनगर, 17 ऑगस्ट (हिं.स.)।

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे (नाना) यांच्या वाढदिवसानिमित्त फुलंब्री तालुक्यातील श्री संत सावता संकूल यांच्या विद्यमाने आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.

खेळामुळे शारीरिक तंदुरुस्ती, आत्मविश्वास आणि सकारात्मक जीवनशैलीला चालना मिळते, या उद्देशाने आयोजित या स्पर्धेला क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे आमदार अनुराधा चव्हाण यांनी दिली.

यावेळी स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा गौरव करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

फुलंब्रीच्या मातीतून अधिकाधिक खेळाडूंनी पुढे यावे आणि क्रीडा क्षेत्रात आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करावे, हीच अपेक्षा व्यक्त केली.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande