पुणे जिल्ह्यात २८ लाखांहून अधिक मतदार वगळले जाण्याची शक्यता
पुणे, 17 ऑगस्ट (हिं.स.)मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर (SIR) मोहिमेत पुणे जिल्ह्यातील तब्बल २८ लाख ३८ हजार ७१९ मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता आहे. अनुपस्थित, स्थलांतरित, दुबार आणि मृत मतदारांच्या श्रेणीत टाकण्यात आलेल्या
पुणे जिल्ह्यात २८ लाखांहून अधिक मतदार वगळले जाण्याची शक्यता


पुणे, 17 ऑगस्ट (हिं.स.)मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर (SIR) मोहिमेत पुणे जिल्ह्यातील तब्बल २८ लाख ३८ हजार ७१९ मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता आहे. अनुपस्थित, स्थलांतरित, दुबार आणि मृत मतदारांच्या श्रेणीत टाकण्यात आलेल्या या मतदारांची मतदारसंघनिहाय यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दरम्यान, एसआयआर मोहिमेअंतर्गत गणना अर्ज समाविष्ट करण्यासाठी आज अंतिम मुदत आहे. एसआयआर मोहिमेला आता केवळ एक दिवस उरला असून, जिल्ह्यात एकूण ९० लाख ८० हजार १७३ मतदार आहेत. त्यापैकी आतापर्यंत ८९ लाख ३४ हजार ४५९ मतदारांना, म्हणजेच ९९.५० टक्के मतदारांना गणना अर्जांचे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेने दिली आहे. पूर्ण माहिती भरलेल्या ६० लाख ९७ हजार ६१७ मतदारांचे गणना अर्ज संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्येच्या तुलनेत ही संख्या ६७.१५ टक्के आहे. दरम्यान, उर्वरित २८ लाख ३८ हजार ७१९ मतदारांचे गणना अर्ज उपलब्ध होऊ शकलेले नाहीत.

अनुपस्थित, स्थलांतरित, दुबार आणि मृत मतदारांचा समावेश या श्रेणीत करण्यात आला आहे. अशा मतदारांची मतदारसंघनिहाय यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. एसआयआर प्रक्रियेत संबंधित मतदारांचे अर्ज समाविष्ट करण्यासाठी अंतिम मुदत संपत असल्याने उर्वरित अर्जांची नोंदणी आणि प्रक्रिया पूर्ण करण्याकडे जिल्हा निवडणूक यंत्रणेचे लक्ष आहे. मतदारांनी आपले नाव यादीत कायम आहे की नाही, तसेच गणना अर्जाची नोंद झाली आहे का, याची पडताळणी करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande