विश्वास झारगड यांची केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात असिस्टंट कमांडंट पदी निवड
छत्रपती संभाजीनगर, 17 ऑगस्ट (हिं.स.)। चांगतपुरी येथे कु. विश्वास विजयकुमार झारगड यांची केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CAPF) असिस्टंट कमांडंट (AC) या पदावर निवड झाली आहे. छत्रपती संभाजी नगर येथील शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी त्याचे कौतुक के
अ


छत्रपती संभाजीनगर, 17 ऑगस्ट (हिं.स.)।

चांगतपुरी येथे कु. विश्वास विजयकुमार झारगड यांची केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CAPF) असिस्टंट कमांडंट (AC) या पदावर निवड झाली आहे.

छत्रपती संभाजी नगर येथील शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी त्याचे कौतुक केले

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर त्यांनी UPSC परीक्षेत १४५ वा क्रमांक मिळवत हे उल्लेखनीय यश संपादन केले. त्यांचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास निश्चितच कौतुकास्पद आहे.

त्यांचे हे यश चांगतपुरी, सायगाव आणि संपूर्ण पैठण तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. देशसेवेच्या या नव्या जबाबदारीसाठी त्यांना शुभेच्छा देत, भविष्यात आणखी मोठी यशशिखरे गाठावीत, असे त्यांनी सांगितले

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande