बीड : श्री ओंकारेश्वर मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न
बीड, 17 ऑगस्ट (हिं.स.)। श्रावणी सोमवारच्या पवित्र पर्वावर गेवराई शहरातील सरस्वती कॉलनी क्र. २ येथे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ''शिवछत्र'' परिवाराच्या माध्यमातून नव्याने उभारण्यात आलेल्या श्री. ओंकारेश्वर मंदिराचा प्राणप्रतिष
Q


बीड, 17 ऑगस्ट (हिं.स.)। श्रावणी सोमवारच्या पवित्र पर्वावर गेवराई शहरातील सरस्वती कॉलनी क्र. २ येथे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली 'शिवछत्र' परिवाराच्या माध्यमातून नव्याने उभारण्यात आलेल्या श्री. ओंकारेश्वर मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संत-महंतांच्या पावन उपस्थितीत आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

या संदर्भात अधिक माहिती देताना आमदार विजयसिंह पंडित म्हणाले, दगडी वास्तुकलेत साकारलेले श्री ओंकारेश्वर मंदिर हे केवळ श्रद्धेचे केंद्र न राहता, गेवराई शहराच्या धार्मिक व अध्यात्मिक वैभवात भर घालणारे पवित्र स्थान ठरणार आहे. विधिवत पूजा-अर्चा, मंत्रोच्चार आणि हर हर महादेवाच्या जयघोषात भगवान श्री ओंकारेश्वर महादेवाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

या मंगलप्रसंगी श्री ओंकारेश्वर महादेवाचे मनोभावे दर्शन घेऊन मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या सुख-समृद्धी, आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना केली. सरस्वती कॉलनी क्र. २ मधील रहिवासी बांधवांचे तसेच या धार्मिक कार्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande