
नांदेड, 17 ऑगस्ट (हिं.स.)।
किनवटमध्ये वंचित बहुजन आघाडीचा संवाद दौरा व पक्ष प्रवेश सोहळा उत्साहात साजरा झाला. वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्हा कमिटीच्यावतीने ‘किनवट संवाद दौरा टप्पा-२’ अंतर्गत संवाद बैठक व जाहीर पक्ष प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी विविध क्षेत्रातील बहुजन कार्यकर्ते व नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीच्या विचारांवर विश्वास ठेवत पक्षात जाहीर प्रवेश केला. संघटनात्मक बांधणी, गावागावात शाखा विस्तार आणि सभासद नोंदणी अभियानाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष प्रा. राज अटकोरे, पंढरी अहंकारे, के. एच. वने, बालाजी इंगोले, निखिल वाघमारे, दूधराम राठोड यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis