परभणीत मिशन लक्षवेध अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा संपन्न
परभणी, 17 ऑगस्ट (हिं.स.)। क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत ‘मिशन लक्षवेध’ योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून ऑलिम्पिक स्तरावर खेळल्या जाणाऱ्या १२ खेळ प्रकारांवर लक्ष केंद्रित करण्याचे शासनाचे धो
मिशन लक्षवेध अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा संपन्न


परभणी, 17 ऑगस्ट (हिं.स.)।

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत ‘मिशन लक्षवेध’ योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून ऑलिम्पिक स्तरावर खेळल्या जाणाऱ्या १२ खेळ प्रकारांवर लक्ष केंद्रित करण्याचे शासनाचे धोरण आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील खेळ व खेळाडू, क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, क्रीडाविषयक पायाभूत सुविधा, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, क्रीडा वैद्यकशास्त्र, खेळाडूंना प्रोत्साहन व पुरस्कार, करिअर मार्गदर्शन तसेच खेळाडूंच्या क्षमता विकासासाठी देशी-विदेशी संस्थांचे सहकार्य अशा विविध घटकांचा विकास करण्यात येणार आहे.ही योजना त्रिस्तरीय असून राज्यस्तरावर हाय परफॉर्मन्स सेंटर, विभागीय स्तरावर स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर आणि जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र या माध्यमातून राबविण्यात येत आहे.मिशन लक्षवेध योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यातील क्रीडा प्रतिभा विकास केंद्रामार्फत अॅथलेटिक्स, कुस्ती आणि टेबल टेनिस या तीन क्रीडा प्रकारांमध्ये प्रत्येकी २० खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. जिल्हास्तरावरील या केंद्रांद्वारे पात्र व गुणवंत खेळाडूंना संबंधित खेळामध्ये प्रगत प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने प्रशिक्षण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत.टेबल टेनिस खेळाच्या प्रशिक्षणाचे उद्घाटन उत्तम लटपटे यांनी केले. अॅथलेटिक्स खेळाच्या प्रशिक्षणाचे उद्घाटन आण्णा डिघोळे यांनी केले, तर कुस्ती खेळाच्या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande