युवकांसाठी राज्यव्यापी ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धा
रायगड, १७ ऑगस्ट (हिं.स.) : मृद व जलसंधारणाबाबत युवकांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यासाठी मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या जलसंधारण सप्ताहादरम्यान राज्यव्यापी ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आल
Youth should participate in the ‘Reel for Soil and Water Conservation’ competition.


रायगड, १७ ऑगस्ट (हिं.स.) : मृद व जलसंधारणाबाबत युवकांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यासाठी मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या जलसंधारण सप्ताहादरम्यान राज्यव्यापी ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’, जलसंधारणाची शपथ यासह विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून युवकांसाठी ही रील्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धकांनी ३० ते ६० सेकंदांची Instagram Reel तयार करून ती स्वतःच्या Public Instagram Account वर पोस्ट करायची आहे. रीलच्या सुरुवातीला विषयाचा उद्देश, स्वतःचे संपूर्ण नाव आणि जिल्ह्याचे नाव नमूद करणे आवश्यक आहे.

तसेच मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत Instagram Account ला Tag करून #SaveSoilSaveWater हा हॅशटॅग वापरणे बंधनकारक आहे.

स्पर्धकांना माती संवर्धन, पाणी बचत, मृद व जलसंधारण, पावसाचे पाणी संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, पारंपरिक जलसंधारण पद्धती तसेच नाविन्यपूर्ण संवर्धनाच्या कल्पनांवर Reel तयार करता येणार आहे.

स्पर्धेचे परीक्षण एकूण १०० गुणांवर करण्यात येणार आहे. त्यामध्ये विषय व संदेशासाठी ३०, कल्पकतेसाठी २५, सामाजिक संदेशासाठी २०, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्तेसाठी १५ आणि Instagram Engagement साठी १० गुण दिले जाणार आहेत.

केवळ Likes किंवा Followersच्या संख्येच्या आधारे विजेता निवडला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रत्येक जिल्ह्यात विजेत्यांना रोख बक्षीस

प्रत्येक जिल्ह्यातील विजेत्यांना रोख बक्षिसे आणि गौरवचिन्ह देण्यात येणार आहे.

प्रथम क्रमांक — २५ हजार रुपये

द्वितीय क्रमांक — १५ हजार रुपये

तृतीय क्रमांक — १० हजार रुपये

याशिवाय पात्र सहभागींना ई-प्रमाणपत्र देण्यात येणार असून विजेत्यांचा ‘युवा मृद-जलदूत’ म्हणून गौरव केला जाणार आहे.

“एक Reel... मातीसाठी! एक Reel... पाण्यासाठी! एक Reel... सुरक्षित भविष्यासाठी!” या संदेशातून युवकांनी या अभिनव उपक्रमात सहभागी होऊन मृद व जलसंधारणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande