चाकण औद्योगिक परिसरातील प्रश्नांवर कालबद्ध उपाययोजना; अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित
पुणे, 18 ऑगस्ट (हिं.स.)। चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, अवजड वाहनांचे पार्किंग, अतिक्रमणे, वीजपुरवठा तसेच अन्य पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर कालबद्ध पद्धतीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी जितेंद्र
fgdf


पुणे, 18 ऑगस्ट (हिं.स.)। चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, अवजड वाहनांचे पार्किंग, अतिक्रमणे, वीजपुरवठा तसेच अन्य पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर कालबद्ध पद्धतीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत विविध शासकीय यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामांची स्पष्ट जबाबदारी आणि कालमर्यादा निश्चित करून देण्यात आली.

या बैठकीस आमदार बाबाजी काळे, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्यासह पीएमआरडीए, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, एमएसआरडीसी, एमएसआयडीसी आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार चाकण औद्योगिक परिसरातील विविध प्रश्नांच्या समन्वयासाठी जिल्हाधिकारी आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत एमआयडीसी, एमएसआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद, जिल्हा परिषद, महसूल आणि पोलीस विभागांसह विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विविध विभागांकडून स्वतंत्रपणे कामे केली जात असताना निर्माण होणारा समन्वयाचा अभाव दूर करून सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे उपाययोजना कराव्यात, यावर बैठकीत भर देण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande