ज्ञानेश कुमारांना अमेरिकेत घेऊन जा, ईव्हीएमही पाठवू- पवन खेरा
नवी दिल्ली , 18 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय निवडणूक व्यवस्थेचे कौतुक केल्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. काँग्रेसच्या मीडिया आणि प्रचार विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी ट्रम्प यांना उद्देशू
ज्ञानेश कुमारांना अमेरिकेत घेऊन जा, ईव्हीएमही पाठवू- पवन खेरा


नवी दिल्ली , 18 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय निवडणूक व्यवस्थेचे कौतुक केल्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. काँग्रेसच्या मीडिया आणि प्रचार विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी ट्रम्प यांना उद्देशून, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अमेरिकेत घेऊन जा आणि तिथेच ठेवा, असा टोला लगावला. तसेच भारत आपल्या ईव्हीएमही पुढील उपलब्ध विमानाने अमेरिकेला पाठवेल, असेही त्यांनी उपरोधिकपणे म्हटले.

पवन खेरा यांनी मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत लिहिले, “प्रिय डोनाल्ड ट्रम्प, कृपया ज्ञानेश कुमार गुप्ता यांना अमेरिकेत घेऊन जा आणि त्यांना तिथेच ठेवा.आम्ही आमची ईव्हीएमही पुढील उपलब्ध विमानाने पाठवू.” पवन खेरा यांनी ट्रम्प यांच्या वक्तव्यावर उपरोधिक टीका करताना म्हटले की, भारताकडून ज्ञानेश कुमार आणि ईव्हीएम अमेरिकेला पाठवणे हे अमेरिकेसाठी एक प्रकारचे ‘उपकार’ ठरेल. आपल्या पोस्टच्या शेवटी त्यांनी “To SIR With Love, from India” असे लिहूनही टोला लगावला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर भारतीय निवडणूक व्यवस्थेचे उदाहरण देत अमेरिकेतील निवडणूक प्रक्रियेत कठोर नियमांची गरज असल्याचे सांगितले. ट्रम्प यांनी म्हटले की, भारतातील नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुमारे ६४.६ कोटी लोकांनी मतदान केले, तर एक टक्क्यापेक्षा कमी मतदारांनी टपालाद्वारे मतदान केले. भारतात प्रत्येक मतदाराकडे वैध फोटो ओळखपत्र असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी या महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान, अमेरिकेत वैध फोटो ओळखपत्राशिवाय निवडणुका कशा घेतल्या जातात, असा प्रश्न उपस्थित केला होता. अमेरिकेतील निवडणुकांमध्ये मतदार ओळखीसंदर्भातील नियम अधिक कठोर करण्याच्या भूमिकेसाठी ट्रम्प यांनी याच मुद्द्याचा आधार घेतला.

अमेरिकेतील निवडणुकांमध्ये नागरिकत्व आणि मतदार ओळखीसंदर्भातील नियम अधिक कडक करण्यासाठी 'सेव्ह अमेरिका' कायदामंजूर करण्याची मागणी ट्रम्प यांनी पुन्हा केली आहे. या प्रस्तावित कायद्यानुसार, मतदार म्हणून नोंदणी करताना अमेरिकन नागरिकत्वाचा पुरावा सादर करणे बंधनकारक करणे, देशभरात मतदार ओळखपत्राची (Voter ID) अनिवार्यता लागू करणे आणि टपालाद्वारे मतदानावर मर्यादा आणणे, यांसारख्या तरतुदींचा समावेश आहे.ट्रम्प यांच्या मते, अशा उपाययोजनांमुळे निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यास मदत होईल.

यापूर्वीही ट्रम्प यांनी भारतीय निवडणूक प्रणाली आणि मतदार ओळखीसंदर्भात आपली मते व्यक्त केली आहेत. आता भारतीय निवडणूक व्यवस्थेचे कौतुक केल्यानंतर काँग्रेसने दिलेल्या या प्रतिक्रियेमुळे भारतीय आणि अमेरिकी निवडणूक व्यवस्थेवरील राजकीय चर्चा पुन्हा रंगली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande