अमरावती - कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चरच्या स्वच्छता कंत्राटातील भाग दोनला मंजुरी
स्थायी समितीचा निर्णय; प्रलंबित देयकाचा मार्ग मोकळा भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी झोननिहाय कंत्राटदार नेमण्याचे निर्देश अमरावती, 18 ऑगस्ट (हिं.स.) : स्वच्छतेचे कंत्राट देण्यात आलेल्या आणि वादग्रस्त ठरलेल्या कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर कंपन
..अखेर कोणार्कच्या कंत्राटातील सर्व अडथळे दूर


स्थायी समितीचा निर्णय; प्रलंबित देयकाचा मार्ग मोकळा

भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी झोननिहाय कंत्राटदार नेमण्याचे निर्देश

अमरावती, 18 ऑगस्ट (हिं.स.) : स्वच्छतेचे कंत्राट देण्यात आलेल्या आणि वादग्रस्त ठरलेल्या कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या भाग दोनच्या कामांना अखेर स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. प्रशासकीय राजवटीत कंत्राट देताना भाग दोनमधील चार झोनच्या कामांसाठी स्थायी समितीची मंजुरी घेण्यात आली नव्हती. आता प्रशासनाकडून सादर करण्यात आलेल्या स्पष्टीकरणानंतर समितीने या कामांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे कंपनीचे कंत्राट पूर्ण होण्यासह प्रलंबित देयक अदा करण्याचा मार्गही सुकर झाला आहे.

महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेच्या कामाचे दोन भाग करण्यात आले आहेत. भाग एकमध्ये शहरातील कचरा वाहतूक, तर भाग दोनमध्ये दैनंदिन कचरा संकलनाचा समावेश आहे. प्रशासकीय राजवटीत हे दोन्ही कंत्राट कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला सात वर्षांसाठी सुमारे २८० कोटी रुपयांना देण्यात आले आहेत.

भाग एकच्या कंत्राटाला मंजुरी देताना भाग दोनमधील केवळ एका झोनच्या कंत्राटासाठी स्थायी समितीची मंजुरी घेण्यात आली होती. मात्र, उर्वरित चार झोनसाठी मंजुरी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रशासनाने हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी सादर केला होता. समितीने प्रशासनाकडे परिपूर्ण अहवाल मागविला होता. प्रशासनाकडून स्पष्टीकरण प्राप्त झाल्यानंतर झालेल्या सभेत भाग दोनच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती सभापती अविनाश मार्डीकर यांनी दिली.

कंत्राटदाराला कामकाजाबाबत निर्देश

कोणार्क कंपनीला काम करताना काही महत्त्वाच्या अटींचे पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक प्रभागात ५४ कामगारांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली असून, कामगारांची दररोज हजेरी नोंदविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

याशिवाय वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था, कंपोस्ट डेपोवर जमा होणाऱ्या कचऱ्याचे मोजमाप तसेच वाहनांमध्ये जीपीएस प्रणाली बंधनकारक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

झोननिहाय भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण

शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीने झोननिहाय निर्बिजीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. सध्या प्रतिवर्षी दोन हजार कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असले तरी शहरातील कुत्र्यांची संख्या लक्षात घेता हे उद्दिष्ट अपुरे असल्याचे समितीने नमूद केले.

शहरात ३० हजारांहून अधिक भटक्या कुत्रे असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिवर्षी दोन हजार कुत्र्यांचे निर्बिजी

--------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande