पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेचे आमदार चिखलीकरां कडून कौतुक
नांदेड, 18 ऑगस्ट (हिं.स.)। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्या सुरक्षेचा क्षण, आपल्या प्राणाची पर्वा न करता कर्तव्य बजावणारे स्पेशल प्रोटेक्शन युनिट (SPU) चे पोलीस निरीक्षक श्री. संतोष केंद्रेजी यांच्या धाडसाला आणि प्रसंगावधानाला सल
अ


नांदेड, 18 ऑगस्ट (हिं.स.)।

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्या सुरक्षेचा क्षण, आपल्या प्राणाची पर्वा न करता कर्तव्य बजावणारे स्पेशल प्रोटेक्शन युनिट (SPU) चे पोलीस निरीक्षक श्री. संतोष केंद्रेजी यांच्या धाडसाला आणि प्रसंगावधानाला सलाम! या शब्दाचा आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी संतोष केंद्रे यांचे कौतुक केले

त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रसंगी क्षणाचाही विलंब न करता सुखबीरसिंग बादल यांच्या सुरक्षेसाठी धावून जात श्री. संतोष केंद्रे यांनी दाखवलेले धैर्य आणि निष्ठा खरोखरच कौतुकास्पद आहे.

आमदार चिखलीकर यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या या शौर्याबद्दल आणि निःस्वार्थी कामगिरीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले व त्यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली.

यावेळी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे नगरसेवक साबेर चाऊस, नगरसेवक हबीब बावजीर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव सुनिल नानवटे, प्रा. आर. बी. जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील इंगळे, रोहन कांबळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande