नांदेड - उपोषणकर्ते धोंडीबा कोंडीबा आठवले यांचे आमरण उपोषण मागे
नांदेड, 18 ऑगस्ट (हिं.स.)। एका महिन्यात बारड येथील रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्याचे अभिवचन दिल्या नंतर उपोषणकर्ते धोंडीबा कोंडीबा आठवले यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले. ज्या भागात प्रचंड दबावाचे राजकारण केले जाते तिथे रस्त्यासाठी उ
अ


नांदेड, 18 ऑगस्ट (हिं.स.)। एका महिन्यात बारड येथील रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्याचे अभिवचन दिल्या नंतर उपोषणकर्ते धोंडीबा कोंडीबा आठवले यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले.

ज्या भागात प्रचंड दबावाचे राजकारण केले जाते तिथे रस्त्यासाठी उपोषण करणाऱ्या प्रगतिशील शेतकरी धोंडीबा उर्फ भंतू कोंडीबा आठवले यांचे योगदान कधीच विसरता येणार नाही. त्यांच्या उपोषणानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशान्वे आणि खा. रविंद्र चव्हाण यांच्या मध्यस्थीने प्रशासनाने एका महिन्यात बारड येथील रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्याचे अभिवचन दिल्या नंतर उपोषणकर्ते धोंडीबा कोंडीबा आठवले यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले. खा. रविंद्र चव्हाण आणि तहसीलदार आनंद देऊळगावकर यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन आठवले यांनी आपले आमरण उपोषण सोडले. यावेळी खा. रविंद्र चव्हाण यांनी थेट जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर जिल्हाधिकारी कर्डिले यांनी तहसीलदार यांच्याशी चर्चा केली.

यावेळी खा. रविंद्र चव्हाण, मुदखेड तहसीलदार आनंद देऊळगावकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील राजेगोरे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख, गटविकास अधिकारी शेखर देशमुख, नायब तहसीलदार मारोती जगताप, पोलिस निरीक्षक दत्तात्रय मंडाळे, ग्रामविकास अधिकारी सतीश लाटकर, प्रा. संदीपकुमार देशमुख, सुभाष लोणे, नरसिंगराव आठवले, नगरसेवक प्रतिनिधी मुजीब पठाण, गंगाधर डांगे, महेश देशमुख, अनुराग आठवले व असंख्य नागरिक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande