नांदेड : खा. ज्योती वाघमारे यांची शिवसेनेच्या आमदारांसोबत व्यापक बैठक
नांदेड, 18 ऑगस्ट (हिं.स.)। शिवसेनेच्या कणखर व आक्रमक प्रवक्त्या तथा राज्यसभा खासदार डॉ.ज्योती वाघमारे या ‘शिवदुर्गा संवाद दौऱ्यानिमित्त’ नांदेड दौऱ्यावर आल्या असता त्यांनी शिवसेना आमदार आनंद बोंढारकर यांच्या शिवनेरी जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट
अ


नांदेड, 18 ऑगस्ट (हिं.स.)। शिवसेनेच्या कणखर व आक्रमक प्रवक्त्या तथा राज्यसभा खासदार डॉ.ज्योती वाघमारे या ‘शिवदुर्गा संवाद दौऱ्यानिमित्त’ नांदेड दौऱ्यावर आल्या असता त्यांनी शिवसेना आमदार आनंद बोंढारकर यांच्या शिवनेरी जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

यावेळी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसह विविध सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे कार्य करण्याबाबत यावेळी विचारविनिमय झाला. त्यावेळी शिवसेना शहरप्रमुख तुलजेश यादव, युवासेना जिल्हाप्रमुख बाळु पाटील मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande