
छत्रपती संभाजीनगर, 18 ऑगस्ट (हिं.स.)। मतदार यादी शुद्धीकरण आणि विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेमुळे जिल्ह्यातील तब्बल ६ लाख १२ हजार ७०१ मतदारांची नावे अंतिम यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. हे प्रमाण एकूण मतदारांच्या १९.०५ टक्के आहे. शहरातील औरंगाबाद पूर्व, मध्य आणि पश्चिम या तीन मतदारसंघांमध्येच ३ लाख ४३ हजार ९६३ मतदारांची माहिती उपलब्ध झालेली नाही. पूर्वमध्ये १,१७,०७५, मध्यमध्ये १,१७,३५८, तर पश्चिममध्ये १,०९,५३० मतदारांची नावे ‘अगोळा’ म्हणून नोंदवण्यात आली आहेत. प्रत्यक्ष पडताळणीत ही नावे आढळली नाहीत तर आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. नाव वगळले गेल्यास नागरिकांना फॉर्म-६ भरून पुन्हा मतदार यादीत नाव नोंदवता येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis