हिंगोली जिल्हा दौऱ्यादरम्यान शिवसेना महिला प्रवक्त्यांनी दिली आमदारांच्या निवासस्थानी भेट
नांदेड, 18 ऑगस्ट (हिं.स.)। शिवदुर्गा संवाद दौऱ्याच्या निमित्ताने नांदेड-हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शिवसेना महिला प्रवक्त्या तथा खासदार ज्योतीताई वाघमारे, उपनेत्या कलाताई शिंदे, उपनेत्या विजयाताई पोटे, उपनेत्या संगीताताई ठोंबरे यांनी शिवसे
अ


नांदेड, 18 ऑगस्ट (हिं.स.)। शिवदुर्गा संवाद दौऱ्याच्या निमित्ताने नांदेड-हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शिवसेना महिला प्रवक्त्या तथा खासदार ज्योतीताई वाघमारे, उपनेत्या कलाताई शिंदे, उपनेत्या विजयाताई पोटे, उपनेत्या संगीताताई ठोंबरे यांनी शिवसेना आमदार हेमंत पाटील यांच्या तुकाई निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.शिव दुर्गा संवाद दौऱ्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या महिला नेत्या नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील महिलांची थेट संवाद साधण्याच्या दृष्टीने त्यांचा हा दौरा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी त्यांचा सन्मान-सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना पक्ष वाढीच्या संदर्भात आमदार हेमंत पाटील यांनी चर्चा केली.

यावेळी हेमंत पाटील आई-दादा, ऍड. रविंद्र रगटे, डॉ. सोमेश्वर पतंगे, महिला जिल्हाप्रमुख गीताताई पुरोहित व आमच्या परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande