नांदेड - 'शौर्य डिफेन्स करिअर अकॅडमी' ला आ. प्रताप पाटील चिखलीकर यांची भेट
नांदेड, 18 ऑगस्ट, (हिं.स.)। सोनखेड येथील कॅप्टन संजय कदम यांच्या ''शौर्य डिफेन्स करिअर अकॅडमी'' ला लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सस्नेह भेट दिली. या शुभप्रसंगी अकॅडमीच्या प्रांगणात
अ


नांदेड, 18 ऑगस्ट, (हिं.स.)। सोनखेड येथील कॅप्टन संजय कदम यांच्या 'शौर्य डिफेन्स करिअर अकॅडमी' ला लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सस्नेह भेट दिली. या शुभप्रसंगी अकॅडमीच्या प्रांगणात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा छोटासा प्रयत्न केला.

यावेळी बोलताना आमदार चिखलीकर म्हणाले की,भावी सैनिकांना शिस्त आणि देशभक्तीचे धडे देणाऱ्या या वास्तूत रोपे लावून एक नवीन ऊर्जा मिळाली. एकीकडे देशाच्या रक्षणासाठी सज्ज होणारी युवा पिढी आणि दुसरीकडे वसुंधरेचे रक्षण करणारे हे वृक्ष हा संगम खरोखरच प्रेरणादायी आहे.

याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य बंडेवार, डॉ. पंजाबराव देशमुख, सुनील मोरे, सोपान मोरे जी यांच्यासह इतर सर्व मान्यवर आणि अकॅडमीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande