टपाल विभागातील निवृत्तिवेतनधारकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी पेन्शन अदालतीचे आयोजन
पुणे, 18 ऑगस्ट (हिं.स.)। टपाल विभागातील निवृत्तिवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई येथे ह
टपाल विभागातील निवृत्तिवेतनधारकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी पेन्शन अदालतीचे आयोजन


पुणे, 18 ऑगस्ट (हिं.स.)। टपाल विभागातील निवृत्तिवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई येथे ही अदालत होणार आहे.

टपाल विभागातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनाशी संबंधित तसेच सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंब निवृत्तिवेतनाशी संबंधित ज्या तक्रारींचे तीन महिन्यांच्या आत निराकरण झालेले नाही, अशा प्रकरणांचा पेन्शन अदालतीमध्ये विचार करण्यात येणार आहे.

वारसा प्रमाणपत्र, वेतनश्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबींशी संबंधित प्रकरणांचा पेन्शन अदालतीमध्ये विचार केला जाणार नाही. तसेच शिस्तभंगाची प्रकरणे आणि डीपीसीच्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित असलेली प्रकरणेही विचारात घेतली जाणार नाहीत.

पेन्शनधारकांनी आपल्या तक्रारी विहित नमुन्यात तीन प्रतींमध्ये सादर कराव्यात. तक्रारी वरिष्ठ लेखाधिकारी, सचिव, पेन्शन अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जी.पी.ओ. इमारत, पहिला मजला, मुंबई–४००००१ या पत्त्यावर पाठवाव्यात.

तसेच तक्रारी accts.mh@indiapost.gov.in या ई-मेल पत्त्यावरही पाठविता येतील. तक्रारी २५ ऑगस्ट २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी सादर करणे आवश्यक आहे.

विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या तक्रारींचा पेन्शन अदालतीमध्ये विचार केला जाणार नाही, असे पुणे ग्रामीण मंडळाचे अधीक्षक दि. वि. सर्जेराव यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande