रायगड जिल्हा पुरवठा कार्यालयात वाहनचालकासाठी दरपत्रक मागविले
रायगड, 18 ऑगस्ट (हिं.स.) : रायगड जिल्हा पुरवठा कार्यालयासाठी बाह्यस्रोताद्वारे कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात वाहनचालकाची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक सेवा पुरवठादारांकडून दरपत्रके मागविण्यात आली आहेत. शासनाच्या सुधारि
रायगड जिल्हा पुरवठा कार्यालयात वाहनचालकासाठी दरपत्रक मागविले


रायगड, 18 ऑगस्ट (हिं.स.) : रायगड जिल्हा पुरवठा कार्यालयासाठी बाह्यस्रोताद्वारे कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात वाहनचालकाची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक सेवा पुरवठादारांकडून दरपत्रके मागविण्यात आली आहेत.

शासनाच्या सुधारित आकृतीबंधानुसार जिल्हा पुरवठा कार्यालयासाठी वाहनचालकाचे एक पद मंजूर करण्यात आले असून, हे पद बाह्यस्रोताद्वारे भरण्याचे निर्देश आहेत. वाहनचालकासाठी मासिक कमाल २६ हजार ९०० रुपये वेतन निश्चित करण्यात आले आहे. हा दर सर्व करांसह अनुज्ञेय महत्तम दर आहे.

इच्छुक सेवा पुरवठादारांनी निर्धारित अटी व नियमांनुसार दरपत्रके सादर करावीत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. रविंद्र शेळके यांनी केले आहे.--------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande