
छत्रपती संभाजीनगर, 18 ऑगस्ट (हिं.स.)। माती आणि जलसंधारणाचा संदेश युवकांपर्यंत तसेच समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘रिल फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ ही राज्यस्तरीय रिल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १५ ते ३० वर्षे वयोगटातील युवक-युवतींना या स्पर्धेत सहभागी होता येणार असून १ १९ ऑगस्टदरम्यान रिल अपलोड करता येणार आहे.
अधिक माहिती व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोबत दिलेला QR कोड स्कॅन करा.
जिल्हास्तरावर प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार आणि १० हजार रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. याशिवाय विजेत्यांना ‘युवा मृद-जलदूत’ म्हणून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार असून उत्कृष्ट सहभागींना ई-सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.
युवक, विद्यार्थी, इन्स्टाग्राम क्रिएटर्स, यूट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन माती आणि पाणी संवर्धनाचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis