नांदेड : पोलीस अधीक्षकांच्या समोर आ. बोंढारकर यांनी मांडल्या सराफांच्या व्यथा
नांदेड, 18 ऑगस्ट (हिं.स.)। नांदेड शहरातील सराफा व्यापारी बांधवांच्या विविध प्रश्नांबाबत शिवसेना आमदार आनंद बोंढारकर यांच्या पुढाकारातून सराफा बाजारातील मुरली मंदिर येथे पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन यांच्या उपस्थितीत व्यापारी बांधवांसोबत महत्वपूर्ण
अ


नांदेड, 18 ऑगस्ट (हिं.स.)। नांदेड शहरातील सराफा व्यापारी बांधवांच्या विविध प्रश्नांबाबत शिवसेना आमदार आनंद बोंढारकर यांच्या पुढाकारातून सराफा बाजारातील मुरली मंदिर येथे पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन यांच्या उपस्थितीत व्यापारी बांधवांसोबत महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी सराफा व्यापाऱ्यांच्या अडचणी, सुरक्षिततेचे प्रश्न आणि प्रमुख मागण्या पोलीस प्रशासनासमोर मांडल्या.

सराफा व्यापारी बांधवांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यासोबतच बैठकीत मांडण्यात आलेल्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. व्यापारी बांधवांच्या प्रश्नांवर प्रशासनासोबत सातत्याने समन्वय साधून ते मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही यावेळी दिली.

यावेळी नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर, शहरप्रमुख तुलजेश यादव, युवासेना जिल्हाप्रमुख बाळू पाटील मोरे आदींसह शहरातील सराफा व्यापारी बांधव उपस्थित होते. सराफा व्यापाऱ्यांची सुरक्षितता आणि त्यांच्या प्रश्नांचे निराकरण यासाठी प्रशासनासोबत समन्वय ठेवून सदैव प्रयत्नशील राहू असे सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande