सोलापूर महापालिका कामगारांची पिळवणूक थांबवा; सभापती श्रद्धा पवार यांची महापौरांकडे तक्रार
सोलापूर, 18 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेतील विविध विभागांमध्ये कार्यरत कामगारांना कार्यालयीन वेळेपेक्षा जास्त वेळ काम करण्यास भाग पाडले जात असून, अतिरिक्त कामाचा मोबदला दिला जात नसल्याचा गंभीर आरोप भाजपच्या नगरसेविका तथा कामगार व समाज कल्या
smc


सोलापूर, 18 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेतील विविध विभागांमध्ये कार्यरत कामगारांना कार्यालयीन वेळेपेक्षा जास्त वेळ काम करण्यास भाग पाडले जात असून, अतिरिक्त कामाचा मोबदला दिला जात नसल्याचा गंभीर आरोप भाजपच्या नगरसेविका तथा कामगार व समाज कल्याण सभापती सौ. श्रद्धा किरण पवार यांनी केला आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामगारांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचेही त्यांनी म्हटले असून, या प्रकरणी त्यांनी महापौरांकडे लेखी तक्रार केली आहे.

महापालिकेतील विविध खात्यांतर्गत मोठ्या प्रमाणावर कामगार कार्यरत आहेत. मात्र, या कामगारांना मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामगारांना हीन दर्जाची व अपमानास्पद वागणूक दिली जाते, असा आरोप नगरसेविका पवार यांनी केला आहे. या प्रकारामुळे कामगारांच्या मानसिक स्वास्थ्यावर तसेच आत्मसन्मानावर विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही कामगारांना जबरदस्तीने थांबवून अतिरिक्त काम करून घेतले जाते. या अतिरिक्त कामाचा (ओव्हरटाईम) योग्य मोबदला अथवा भत्ता दिला जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचबरोबर नोकरीवरून काढण्याची तसेच दंडात्मक कारवाई करण्याची धमकी दिली जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande