नांदेड : शेतकऱ्यांच्या लढ्याला यश; थेट शेताच्या बांधापर्यंत दर्जेदार खडी-मुरूम रस्ता
भूमिपुत्रांच्या प्रयत्नांना यश; शेतकऱ्यांकडून बांधावरच सत्कार नांदेड, 18 ऑगस्ट (हिं.स.)। शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी दर्जेदार खडी-मुरूम रस्त्याची निर्मिती झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. थेट मंत्रालयापासून शेताच्या ब
अ


भूमिपुत्रांच्या प्रयत्नांना यश; शेतकऱ्यांकडून बांधावरच सत्कार

नांदेड, 18 ऑगस्ट (हिं.स.)। शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी दर्जेदार खडी-मुरूम रस्त्याची निर्मिती झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. थेट मंत्रालयापासून शेताच्या बांधापर्यंत सुरू असलेल्या भूमिपुत्रांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले. रस्ता पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी या कामासाठी योगदान देणाऱ्या शेतकरी पुत्रांचा थेट शेताच्या बांधावरच सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील राजेगोरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख, काँग्रेसचे तरुण कार्यकर्ते प्रा. संदीपकुमार देशमुख तसेच इंजि. अमोल लोमटे यांचा शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

“केल्याने होते, केले पाहिजे. कामासाठी पद नव्हे, नियत साफ पाहिजे” अशी भूमिका यावेळी शेतकरी भूमिपुत्रांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या परिसरातील कोणताही प्रश्न असो, त्यासाठी आपण तत्पर राहू, अशी ग्वाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील राजेगोरे यांनी दिली. रस्त्याच्या निर्मितीमुळे शेतकऱ्यांना शेतीमालाची वाहतूक, शेतीसाठी आवश्यक साहित्य ने-आण तसेच दैनंदिन शेतीच्या कामांसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत या कामासाठी पाठपुरावा करणाऱ्या भूमिपुत्रांचे आभार मानले.

यावेळी ज्येष्ठ शेतकरी गुलाबराव देशमुख, गणेशराव देशमुख, संदीप पाटील कवळे, गजेंद्र देशमुख, श्रीनिवास देशमुख, सुधाकर देशमुख, प्रकाश देशमुख, सुभाष देशमुख, अक्षय देशमुख, गंगाधर कोरबनवाड, नागेश अंतेवार यांच्यासह परिसरातील अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या एकजुटीने आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याने प्रश्न मार्गी लागू शकतात, याचे हे काम उदाहरण ठरले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande