
नांदेड, 18 ऑगस्ट (हिं.स.)।
कंधारच्या विकासात नागरिकांच्या मताला प्राधान्य दिली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले
कंधार येथील स्व. शांतीदूत गोविंदराव पाटील चिखलीकर उद्यानाच्या सुशोभीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. हे उद्यान नागरिकांसाठी अधिक देखणे, निसर्गरम्य आणि सर्वसुविधांयुक्त बनावे, यासाठी उद्यानाला आमदार चिखलीकर यांनी भेट देऊन तेथे फिरण्यासाठी आलेल्या नागरिक आणि लहान मुलांशी थेट संवाद साधला.
सुशोभीकरणाच्या या कामात उद्यानामध्ये आणखी कोणत्या नवीन सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, याबाबत नागरिकांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या मौल्यवान सूचना जाणून घेतल्या.
यावेळी उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी, सचिन पाटील चिखलीकर, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष किशनराव डफळे, माजी नगराध्यक्ष स्वप्निल पाटील लुंगारे, माजी उपनगराध्यक्ष जफरखान, नगरसेवक आसिफ शेख, नगरसेवक समीर चाऊस, नगरसेवक मजर शेख, महेंद्र कांबळे यांच्यासह इतर मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis