
छत्रपती संभाजीनगर, 18 ऑगस्ट (हिं.स.)राजस्थानचे महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे (नाना) यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या वतीने सदिच्छा भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी देवगिरी बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शहरिभाऊ बागडे (नाना) यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे तसेच त्यांच्या पुढील सामाजिक व सार्वजनिक कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या. हरिभाऊ बागडे (नाना) यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद आम्हाला सदैव प्रेरणादायी आहेत. त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि जनसेवेप्रती असलेली बांधिलकी आम्हा सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी आहे. त्यांच्या नेतृत्वाला आणि सामाजिक व सार्वजनिक कार्याला सादर प्रणाम
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis