जळगावात बसची आयशर ट्रकला धडक; दोन वृद्ध महिलांचा मृत्यू
जळगाव, 19 ऑगस्ट (हिं.स.) मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावरील बोधे फाट्याजवळ पिंपळगाव आगाराच्या एसटी बसने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या आयशर ट्रकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन वृद्ध महिलांचा जागीच मृत्यू झाला तर ३१ प्रवासी जखम
जळगावात बसची आयशर ट्रकला धडक; दोन वृद्ध महिलांचा मृत्यू


जळगाव, 19 ऑगस्ट (हिं.स.) मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावरील बोधे फाट्याजवळ पिंपळगाव आगाराच्या एसटी बसने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या आयशर ट्रकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन वृद्ध महिलांचा जागीच मृत्यू झाला तर ३१ प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवारी ((दि. १९)) सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास घडली. जखमींवर मालेगाव येथील सामान्य रुग्णालयासह एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यातील काही प्रवाशांची प्रकृति गंभीर असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही मृत महिला या जळगाव जिल्ह्यातील आहेत.

पिंपळगाव आगाराची बस (क्रमांक एमएच ४० वाय ५८२२) पिंपळगाव येथून पाचोरा येथे जात होती. सदर बस सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास मालेगाव स्थानकातून निघून चाळीसगावच्या दिशेने निघाली. यावेळी बसमध्ये ५० पेक्षा अधिक प्रवासी होते. बस चालकाने सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास चाळीसगाव रस्त्यावरील बोधे फाटा येथे ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून चाळीसगावकडून येणाऱ्या आयशर ट्रकला (क्रमांक एमएच १९ सीवाय ८५२५) जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. तर आयशर ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या पाटात जाऊन तीन वेळा उलटला. घटनेनंतर स्थानिकांनी मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने मालेगाव येथे हलविण्यात आले तर अपघातात इरशाद शेख रमजान (वय ६०) रा. नाचनखेडे, ता. जामनेर जि. जळगाव व सकुबाई पिरण माळी (वय ७९) रा. आडगाव, ता. एरंडोल जि. जळगाव या वृध्द महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande