अमरावती-न्यायाधीन बंदीचा तुरुंगाधिकाऱ्यावर हल्ला कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
अमरावती, 19 ऑगस्ट (हिं.स.) अमरावती मध्यवर्ती कारागृहात दैनंदिन संचार फेरीदरम्यान एका न्यायाधीन बंदीने तुरुंगाधिकाऱ्यावर धावून जात त्यांची कॉलर पकडून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी तुरुंगाधिकारी श्रेणी-१ धनसिंग धोंडीबा कवाळे यांच्या
न्यायाधीन बंदीचा तुरुंगाधिकाऱ्यावर हल्ला कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह


अमरावती, 19 ऑगस्ट (हिं.स.) अमरावती मध्यवर्ती कारागृहात दैनंदिन संचार फेरीदरम्यान एका न्यायाधीन बंदीने तुरुंगाधिकाऱ्यावर धावून जात त्यांची कॉलर पकडून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी तुरुंगाधिकारी श्रेणी-१ धनसिंग धोंडीबा कवाळे यांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी न्यायाधीन बंदी निखील कैलास पाटील (वय २४, रा. मांडळ, ता. अमळनेर, जि. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

निखील पाटील हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध विविध जिल्ह्यांत एकूण २२ गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. शहरातील न्यायाधीशांच्या निवासस्थानी झालेल्या चोरीच्या प्रकरणातही त्याचा सहभाग असल्याचे सांगण्यात आले. भातकुली येथील चोरीच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर ६ ऑक्टोबर २०२५ पासून तो अमरावती कारागृहात न्यायाधीन बंदी म्हणून आहे. त्याला न्यू बॅरेक परिसरातील बॅरेक क्रमांक १३ मध्ये ठेवण्यात आले आहे.

कारागृहाचे अधीक्षक, उपअधीक्षक, वरिष्ठ तुरुंगाधिकारी धनसिंग कवाळे, सर्कल तुरुंगाधिकारी हेमंत इंगोले, ज्योती आठवेले, राजेंद्र राठोड, विठ्ठल पवार, श्रीकृष्ण लांजेवार, शिपाई नितीन भोयर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी दैनंदिन संचार फेरीसाठी बॅरेक क्रमांक १३ येथे गेले होते. बंद्यांच्या अडचणी व विनंत्यांचे निराकरण सुरू असताना निखील पाटील अचानक कवाळे यांच्यावर धावून गेला. त्याने त्यांची कॉलर पकडून मारहाण व शिवीगाळ केली. इतर कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून कवाळे यांची सुटका केलीं.

दरम्यान, कारागृहातील यापूर्वीच्या मोबाईल व गांजा सापडण्याच्या घटनांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनाच्या नियंत्रण व्यवस्थेबाबतही चर्चा सु झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande