संरक्षण मंत्री जपानच्या संरक्षण मंत्र्यांबरोबर गुरुवारी नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा करणार
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट (हिं.स.)। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 20 ऑगस्ट 2026 रोजी (गुरुवारी) नवी दिल्ली येथे जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतील. या बैठकीमुळे संरक्षण क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील, धोरण
Bilateral Meeting Rajnath Singh Shinjiro Koizumi August 20


नवी दिल्ली, 19 ऑगस्ट (हिं.स.)। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 20 ऑगस्ट 2026 रोजी (गुरुवारी) नवी दिल्ली येथे जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतील. या बैठकीमुळे संरक्षण क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील, धोरणात्मक विश्वास आणि सहकार्य वाढेल, हिंद-प्रशांत क्षेत्रात स्थिरता आणि सुरक्षेला चालना मिळेल आणि सहकार्याची नवीन क्षेत्रे निश्चित केली जातील, अशी अपेक्षा आहे.

'मेक-इन-इंडिया' चौकटी अंतर्गत संरक्षण उपकरणे आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाबाबतच्या 'तीन तत्त्वांमध्ये' जपानने केलेल्या सुधारणेच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही नेते सागरी सुरक्षेतील अधिक सखोल सहकार्य तसेच संरक्षण उपकरणे आणि तंत्रज्ञानाबाबतच्या निकटच्या सहकार्याविषयी विचार-विनिमय करतील. ही बैठक द्विपक्षीय संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्यासाठी पथदर्शक आराखडा तयार करण्याची संधी देईल.

आपल्या पहिल्या भारत भेटीदरम्यान, शिंजिरो कोईझुमी यांनी 19 ऑगस्ट 2026 रोजी मुंबईतील पश्चिम नौदल कमांडला भेट दिली. यावेळी त्यांनी नौदल प्रमुख ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन आणि पश्चिमी नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ व्हाईस ऍडमिरल संजय वात्स्यायन यांच्याशी चर्चा केली. जपानच्या शिष्टमंडळाला भारतीय नौदलाची भूमिका, जबाबदाऱ्या आणि कार्यान्वयन क्षमतांविषयी माहिती देण्यात आली.

आगमन झाल्यावर मान्यवरांनी पश्चिमी नौदल कमांड येथे मानवंदना स्वीकारली. त्यापूर्वी, त्यांनी 'नेव्हल डॉकयार्ड'मधील 'गौरव स्तंभा'वर पुष्पचक्र अर्पण केले. तसेच, त्यांनी स्वदेशी बनावटीच्या 'आयएनएस चेन्नई' या युद्धनौकेलाही भेट दिली. भारत आणि जपानचा मुक्त, खुल्या, लवचिक आणि समृद्ध हिंद-प्रशांत क्षेत्राच्या निर्मितीचा सामायिक दृष्टीकोन आहे. जपानच्या संरक्षण मंत्र्यांचा दोन दिवसांचा दौरा द्विपक्षीय संरक्षण सहकार्याची वाढती गती अधोरेखित करतो आणि ही भागीदारी आणखी वाढवण्याप्रति दोन्ही बाजूंची वचनबद्धता प्रतिबिंबित करतो. जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दिल्लीत आल्या होत्या, त्यानंतर काही आठवड्यांनी ही भेट होत असून, त्या परिषदेत दोन्ही बाजूंनी संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर सहमती दर्शवली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande