इमरान खान यांची ९ महिन्यांनंतर प्रथमच पत्नी आणि बहिणीशी भेट
इस्लामाबाद, 19 ऑगस्ट (हिं.स.)।पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे संस्थापक इमरान खान यांनी रावळपिंडीतील अदियाला तुरुंगात तब्बल ९ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रथमच पत्नी बुशरा बीबी आणि बहिणीची भेट घेतली.सर
९ महिन्यांनंतर इमरान खान यांची प्रथमच पत्नी आणि बहिणीशी भेट


इस्लामाबाद, 19 ऑगस्ट (हिं.स.)।पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे संस्थापक इमरान खान यांनी रावळपिंडीतील अदियाला तुरुंगात तब्बल ९ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रथमच पत्नी बुशरा बीबी आणि बहिणीची भेट घेतली.सर्वोच्च न्यायालयाने इमरान खान यांच्या ढासळत्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करून त्यांच्या कुटुंबीयांना दर आठवड्याला भेटण्याची परवानगी दिल्यानंतर ही भेट शक्य झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, इमरान खान यांच्या बहिणी नोरिन नियाझी यांनी तुरुंगातील कॉन्फरन्स रूममध्ये त्यांच्याशी सुमारे १५ मिनिटे चर्चा केली. यावेळी दोघांमध्ये खान यांच्या प्रकृतीसह त्यांच्या कायदेशीर परिस्थितीवरही चर्चा झाली. नोरिन यांनी इमरान खान यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची माहिती दिली. न्यायालयाने सरकारला इमरान खान यांना दोन दिवसांच्या आत वैद्यकीय तपासणीसाठी इस्लामाबाद येथील शिफा इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये नेण्याचे आणि १६ सप्टेंबरपर्यंत त्यांना तिथेच ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिला आहे की, या भेटीचा कोणत्याही प्रकारे राजकीय फायदा घेण्यासाठी किंवा राजकीय वक्तव्ये करण्यासाठी वापर केला जाऊ नये. या नियमाचे उल्लंघन झाल्यास दिलेली सवलत मागे घेतली जाऊ शकते, असा इशाराही न्यायालयाने दिला आहे.यामुळेच इमरान खान यांच्या इतर बहिणी अलीमा खान, उजमा खान तसेच त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली नाही.

तुरुंगातील सूत्रांनुसार, इमरान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्यातही कॉन्फरन्स रूममध्ये सुमारे ३५ ते ४० मिनिटे भेट झाली. याशिवाय बुशरा बीबी यांनी त्यांच्या पहिल्या विवाहातून झालेल्या मुलांची तसेच त्यांच्या नणंद मेहरुन्निसा यांचीही स्वतंत्रपणे भेट घेतली.

विशेष म्हणजे, इमरान खान ऑगस्ट २०२३ पासून तुरुंगात आहेत. अल-कादिर ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणात ते १४ वर्षांची शिक्षा भोगत आहेत. इमरान खान यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यास परवानगी देण्यासंदर्भातील याचिकांवर न्यायालय १६ सप्टेंबर रोजी पुन्हा सुनावणी करणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande