बीड - आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोन गुन्हे उघड
बीड, 19 ऑगस्ट (हिं.स.)। : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना ताब्यात घेत दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपी मिथुन दादाराव साळवे (वय २५, रा. रमाईनगर, वडवणी) आणि रोहन कल्याण केकाण (वय २५, रा. जुना मोंढा
पोलीस कारवाई


बीड, 19 ऑगस्ट (हिं.स.)।

: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना ताब्यात घेत दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपी मिथुन दादाराव साळवे (वय २५, रा. रमाईनगर, वडवणी) आणि रोहन कल्याण केकाण (वय २५, रा. जुना मोंढा, वडवणी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींकडून एमएच-२३ ई-६५४४ क्रमांकाची टाटा सुमो (किंमत सुमारे १ लाख रुपये) जप्त करण्यात आली आहे. वडवणी पोलीस ठाण्यातील दोन जबरी चोरीचे गुन्हे या कारवाईत उघड झाले असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande