सीरियाच्या अबू अल-दुहूर हवाई तळावर इस्रायलचा हवाई हल्ला; युएईकडून तीव्र निषेध
अबू धाबी, 19 ऑगस्ट (हिं.स.)।सीरियाच्या इदलिब प्रांतातील अबू अल-दुहूर हवाई तळावर इस्रायली हवाई हल्ले झाल्यानंतर या भागातील तणाव वाढला आहे. संयुक्त अरब अमिरातीने (युएई) या हल्ल्यांचा तीव्र निषेध करत ते सीरियाच्या सार्वभौमत्वाचे, आंतरराष्ट्रीय कायद्या
सीरियावर इस्रायलचा हवाई हल्ला; युएईकडून तीव्र निषेध


अबू धाबी, 19 ऑगस्ट (हिं.स.)।सीरियाच्या इदलिब प्रांतातील अबू अल-दुहूर हवाई तळावर इस्रायली हवाई हल्ले झाल्यानंतर या भागातील तणाव वाढला आहे. संयुक्त अरब अमिरातीने (युएई) या हल्ल्यांचा तीव्र निषेध करत ते सीरियाच्या सार्वभौमत्वाचे, आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणि १९७४ च्या ‘डिसएंगेजमेंट अॅग्रीमेंट’चे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. इस्रायलने आपल्या कारवाईचे समर्थन सुरक्षा संबंधी चिंतांशी जोडले आहे, तर अमेरिकेने हे हल्ले अनावश्यकपणे तणाव वाढवणारे असल्याचे म्हटले आहे. सीरिया, जॉर्डन, कतार आणि तुर्की यांनीही वेगवेगळ्या प्रकारे या हल्ल्यांवर आक्षेप नोंदवला आहे.

युएईच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात इस्रायली हल्ल्यांचा ‘कठोर शब्दांत निषेध’ केला. तसेच सीरियाच्या सुरक्षा आणि स्थैर्याला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही कारवाईला पूर्णपणे विरोध असल्याचे स्पष्ट केले. मंत्रालयाने म्हटले, “सीरियाच्या सार्वभौमत्वाचे कोणतेही उल्लंघन किंवा त्याच्या सुरक्षा आणि स्थैर्याला निर्माण होणारा कोणताही धोका युएई पूर्णपणे नाकारतो.” युएईच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, सीरियाच्या भूभागावर इस्रायलकडून सातत्याने करण्यात येणारे हल्ले हे ‘आंतरराष्ट्रीय कायद्याचे’ तसेच सीरिया आणि इस्रायलदरम्यान १९७४ मध्ये झालेल्या ‘डिसएंगेजमेंट अॅग्रीमेंट’ म्हणजेच सैन्य माघारीसंदर्भातील कराराचे ‘उघड उल्लंघन’ आहे.

मंत्रालयाने म्हटले, “सीरियाच्या स्थैर्याला आणि प्रादेशिक अखंडतेला पाठिंबा देण्याच्या युएईच्या ठाम भूमिकेचा आम्ही पुनरुच्चार करतो. तसेच सीरियन जनतेसोबत एकजुटीने उभे राहून त्यांच्या सुरक्षा, शांतता, सन्मान, शांततापूर्ण सहअस्तित्व आणि विकासाच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या सर्व प्रयत्नांना आम्ही पाठिंबा देतो.” युएईने आंतरराष्ट्रीय समुदायाला सीरियाच्या भूभागावर वारंवार होणारे हल्ले थांबवण्यासाठी आणि तणाव आणखी वाढू नये यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले. अबू धाबीने इशारा दिला की, अशा प्रकारच्या कारवायांमुळे प्रादेशिक तणाव वाढू शकतो आणि प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.

निवेदनात म्हटले आहे, “ युएईने आंतरराष्ट्रीय समुदायाला सीरियाच्या भूभागावर वारंवार होणारे हल्ले थांबवण्यासाठी आणि तणाव वाढण्यापासून रोखण्यासाठी तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. तसेच प्रादेशिक तणाव वाढवू शकणाऱ्या आणि प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेला धोका निर्माण करू शकणाऱ्या कोणत्याही कारवाईला आळा घालण्याचे आवाहन केले आहे.”

इदलिबमधील अबू अल-दुहूर हवाई तळावर इस्रायली हल्ले झाल्याच्या वृत्तानंतर हे निवेदन जारी करण्यात आले. हल्ल्यांनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने सांगितले की, इस्रायल आणि सीरिया सुरक्षा विषयांमध्ये ‘यथास्थिती’ कायम ठेवण्यास सहमत झाले होते.‘एक्स’वरील पोस्टमध्ये नेतन्याहू यांच्या कार्यालयाने म्हटले की, अलेप्पोजवळील एका हवाई तळावर तुर्की सैनिकांना तैनात करण्याची परवानगी देऊन सीरिया या कराराचे उल्लंघन करण्याच्या मार्गावर होता. निवेदनात म्हटले आहे, “इस्रायल आणि सीरिया सुरक्षा विषयांमध्ये यथास्थिती कायम ठेवण्यास सहमत झाले होते. मात्र, अलेप्पोजवळील एका हवाई तळावर तुर्की सैनिकांना तैनात करण्याची परवानगी देऊन सीरिया हा करार मोडण्याच्या मार्गावर होता.” निवेदनात पुढे म्हटले आहे, “इस्रायल आपल्या सुरक्षेला असलेल्या धोक्यांना सहन करणार नाही आणि यथास्थिती पुन्हा प्रस्थापित होण्याचे स्वागत करेल.”

दरम्यान, सीरिया आणि इराकसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांचे विशेष दूत टॉम बॅरक यांनी इस्रायली हवाई हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी हे हल्ले ‘अनावश्यकपणे तणाव वाढवणारे पाऊल’ असल्याचे म्हटले. बॅरक यांनी सांगितले, “अबू अल-दुहूर हवाई तळावर इस्रायलने केलेले हवाई हल्ले अनावश्यकपणे तणाव वाढवणारे असल्याने आम्हाला त्याबद्दल गंभीर चिंता आहे. या हल्ल्यांमुळे परिसरात स्थैर्य निर्माण होणार नाही.”

यापूर्वी सीरियाने या हल्ल्यांनंतर इस्रायलवर आपल्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. जॉर्डन आणि कतारनेही या हल्ल्यांचा निषेध केला. तर तुर्कीने आंतरराष्ट्रीय समुदायाला या प्रकरणी कारवाई करण्याचे आवाहन केले.अबू अल-दुहूर हवाई तळाला चार हवाई हल्ल्यांमध्ये लक्ष्य करण्यात आले. डिसेंबर २०२४ मध्ये सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांचे सरकार पडल्यानंतर या लष्करी तळावर झालेला हा पहिलाच हल्ला असल्याचे सांगितले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande