भारत-बांगलादेश संबंधांना नवी दिशा; पंतप्रधान मोदींकडून तारिक रहमान यांना सन्मानपूर्वक स्वागताची ग्वाही
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट (हिं.स.)।भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंधांमध्ये अलीकडच्या काळात तणाव निर्माण झाला असला, तरी नवी दिल्लीकडून हे संबंध पुन्हा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय उच्चायुक्त दिनेश त्रिवेदी यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान
भारत-बांगलादेश संबंधांना नवी दिशा;पंतप्रधान मोदींकडून तारिक रहमान यांना सन्मानपूर्वक स्वागताची ग्वाही


नवी दिल्ली, 19 ऑगस्ट (हिं.स.)।भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंधांमध्ये अलीकडच्या काळात तणाव निर्माण झाला असला, तरी नवी दिल्लीकडून हे संबंध पुन्हा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय उच्चायुक्त दिनेश त्रिवेदी यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे की, बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांचा प्रस्तावित भारत दौरा संस्मरणीय ठरावा.राजदूत त्रिवेदी यांनी मंगळवारी हे वक्तव्य अशा वेळी केले, जेव्हा १२-१३ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी रहमान यांच्या प्रस्तावित भारत दौऱ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. बडतर्फ करण्यात आलेल्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाच्या मागणीवरून भारत आणि बांगलादेश यांच्यात निर्माण झालेल्या नव्या तणावामुळे ही अनिश्चितता निर्माण झाली आहे.

वृत्तानुसार, त्रिवेदी यांनी मंगळवारी भारतीय उच्चायोगाने बांगलादेशमधील प्रमुख व्यावसायिक नेते आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) च्या प्रतिनिधी मंडळासाठी आयोजित केलेल्या स्वागत समारंभात सांगितले की, पंतप्रधान मोदींचा संदेश स्पष्ट आहे—दोन्ही नेत्यांनी भेटले पाहिजे.

बैठकीदरम्यान राजदूत त्रिवेदी यांनी आश्वासन दिले की, बांगलादेशचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर आल्यास त्यांचे योग्य आणि सन्मानपूर्वक स्वागत केले जाईल.ते म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी फक्त एकच गोष्ट सांगितली आहे—आपली भेट झाली पाहिजे. आणि आपण माझ्याकडून त्यांना सांगू शकता की, बांगलादेशचे पंतप्रधान भारतात आले, तर त्यांचा योग्य तो सन्मान आणि आदर केला जाईल, याची भारताच्या पंतप्रधानांनी त्यांना खात्री दिली आहे.”

दोन्ही देशांच्या नेत्यांमधील मजबूत संबंधांचा अखेर फायदा दोन्ही देशांतील नागरिक आणि व्यावसायिकांना होईल, यावर त्यांनी भर दिला. हा दुरावा कमी करण्यामध्ये जगभरातील व्यापाऱ्यांची मोठी भूमिका असल्याचेही त्रिवेदी यांनी सांगितले. दोन्ही देशांनी भविष्यातील संबंधांकडे पाहताना भूतकाळातील मतभेद सोडवण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. ते म्हणाले, “मी असे म्हणत नाही की तुम्ही भूतकाळ विसरून जा. मात्र, भूतकाळ लक्षात ठेवून जुन्या मतभेदांवर तोडगा काढा आणि पुढे वाटचाल करा. एका ठिकाणी थांबून राहू नका.”

‘सशक्त लोकशाही देशां’मध्ये मतभेद असणे स्वाभाविक आहे आणि संवाद तसेच परस्पर संपर्काच्या माध्यमातून हे मतभेद दूर केले जाऊ शकतात, असेही त्यांनी नमूद केले. “बांगलादेशमधील आपल्या भाऊ-बहिणींच्या चिंता आम्ही चांगल्या प्रकारे समजून घेतो. मात्र, ही समानतेच्या आधारावरची भागीदारी आहे,” असे त्रिवेदी यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande