अमरावती : शहानूर नदीपात्रातील जुगार अड्ड्यावर धाड; १२ जुगारी अटकेत
अमरावती, १९ ऑगस्ट (हिं.स.) : तालुक्यातील खोडगावलगतच्या शहानूर नदीपात्रात सुरू असलेल्या एक्का-बादशहा जुगार अड्ड्यावर अंजनगाव सुर्जी पोलिसांनी धाड टाकून १२ जुगाऱ्यांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी २३ हजार २१० रुपये रोख रक्कम आणि ११ मोटारसायकली असा
एक्का-बादशहा जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड़  १२ जुगारी अटकेत


अमरावती, १९ ऑगस्ट (हिं.स.) : तालुक्यातील खोडगावलगतच्या शहानूर नदीपात्रात सुरू असलेल्या एक्का-बादशहा जुगार अड्ड्यावर अंजनगाव सुर्जी पोलिसांनी धाड टाकून १२ जुगाऱ्यांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी २३ हजार २१० रुपये रोख रक्कम आणि ११ मोटारसायकली असा एकूण ७ लाख ३ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्याचे कर्मचारी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना खोडगाव रोडवरील स्मशानभूमीजवळील शहानूर नदीपात्रातील भावलिंग मंदिराजवळ काही जण एक्का-बादशहा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाड टाकली.

यावेळी जुगार खेळत असलेल्या १२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम आणि ११ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सर्व १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर निर्जन नदीपात्रात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी अचानक कारवाई केल्याने परिसरातील जुगार खेळणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक सुरज बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत चिरडे तसेच पोलीस अंमलदार जयसिंग चव्हाण, शुभम मारकंड, रवि राठोड, अमित घाटे, आकाश रंगारी, प्रमोद चव्हाण, इक्बाल पठाण आणि विलास रावते यांच्या पथकाने केली.-------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande