भारताचा गॉल कसोटीत श्रीलंकेवर १६५ धावांनी विजय
- मानव सुथारचे सामन्यात सर्वाधिक 10 बळी- टीम इंडियाची कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी गॉल(श्रीलंका), 19 ऑगस्ट (हिं.स.)भारताने गॉल येथे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील पहिली कसोटी १६५ धावांनी जिंकली. यासह, भारताने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघ
मानव सुथार


- मानव सुथारचे सामन्यात सर्वाधिक 10 बळी- टीम इंडियाची कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी

गॉल(श्रीलंका), 19 ऑगस्ट (हिं.स.)भारताने गॉल येथे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील पहिली कसोटी १६५ धावांनी जिंकली. यासह, भारताने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मानव सुथारच्या फिरकीची जादू या सामन्यात चांगलीच चालली. पहिल्या डावात चार बळी घेणाऱ्या सुथारने अंतिम डावात सहा बळी घेत श्रीलंकेला ३७२ धावांचे लक्ष्य गाठण्यापासून रोखले. पाचव्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात श्रीलंकेचा संघ २०६ धावांवर सर्वबाद झाला. भारतासाठी हा एक संस्मरणीय विजय होता, कारण हा सामना भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील ६०० वी कसोटी होती.

या विजयात मानव सुथार आणि देवदत्त पडिक्कल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गॉलमध्ये प्रथम फलंदाजी करताना देवदत्त पडिक्कलने परिस्थितीचा फायदा घेत १६७ धावा केल्या आणि आपल्या संघाला पहिल्या डावात १७८ धावांची आघाडी मिळवून दिली. सुथारने या परिस्थितीचा फायदा घेत १० बळी घेतले. त्याने चेंडू स्विंग करण्याची आणि सरळ ठेवण्याची, दोन्ही क्षमता दाखवल्या. आपल्या पहिल्या डावात ४६२ धावा केलेल्या भारताने श्रीलंकेला २८४ धावांवर बाद करून १७८ धावांची भक्कम आघाडी घेतली. भारताने आपल्या दुसऱ्या डावात १९३ धावा केल्या.

पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात करताना श्रीलंकेची धावसंख्या ८४/४ होती. सोनल दिनुशा आणि धनंजय डी सिल्वा यांनी चांगली भागीदारी करून डाव सावरला. दिनुशा आणि डी सिल्वा (१५१ चेंडूंत ५९ धावा) यांनी पाचव्या विकेटसाठी २०२ चेंडूंत ९५ धावा जोडून दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताला एका तासाहून अधिक काळ विजयापासून दूर ठेवले. रवींद्र जडेजाने कर्णधार डी सिल्वाला बाद करून ही भागीदारी तोडली. त्यानंतर श्रीलंकेचा डाव अडखळला.

श्रीलंकेच्या पहिल्या डावात संयमी खेळी खेळलेल्या निरोशन डिकवेला (१०) ने आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केला. त्याने प्रसिद्धच्या गोलंदाजीवर कव्हरवरून फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. श्रीलंकेची सातवी विकेट दिनुशा सुथारच्या रूपाने पडली, जो ८४ धावांवर बाद झाला. त्यानंतर सुथारने प्रभात जयसूर्या, लाहिरू कुमार आणि केसरा नुवान्था यांना त्रिफळाचीत करून श्रीलंकेचा डाव २०६ धावांवर गुंडाळत टीम इंडियाला शानदार विजय साकारुन दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande